….अखेर अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील पद निर्मितीला शासनाने दिली मान्यता
आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश

अहेरी:राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पद निर्मिती बाबत राज्याच्या आरोग्य विभागाने दिनांक १३ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करून आवश्यक असलेले पद भरतीचा मार्ग मोकळा करून दिला आहे.अहेरी येथील स्त्री रुग्णालयाची इमारत बांधकाम पूर्ण होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी होऊन देखील आवश्यक पद निर्मितीला शासनाची मंजुरी नसल्यामुळे या भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळन्यास अडसर निर्माण झाले होते.
अहेरी विधान सभेचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्री पदाच्या कालावधीतच संबधित विभागाला पद निर्मितीबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या व संबधित विषयाला सातत्याने शासनाकडे रेटून लावले होते. २०२४ च्या विधान सभा निवळणुकीत पुन्हा निवळून आल्यावर सर्वप्रथम आमदार आत्राम यांनी स्त्री रुग्णालय अहेरी येथील पद निर्मितीच्या विषयाला हात घातला,त्याचीच परिणीती म्हणून अखेर शासनाने आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी मान्य करून अहेरी येथील स्त्री रुग्णालयाकरिता एकूण ४२ नियमित पदे निर्मित करून त्याला मान्यता दिली आहे.तसेच बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाचे एकूण ५५ पदे निर्मित केली आहे.असे एकूण ९७ पदांना मंजुरी दिली आहे.
नियमित पदांमध्ये वैधकीय अधीक्षक १ पद,वैधकीय अधिकारी स्त्री व प्रसूती रोग१पद,वैधकीय अधिकारी बालरोग तज्ञ१,वैधकीय अधिकारी बधिरीकरण तज्ञ१ पद,क्ष किरण तंत्रज्ञ, बधिरीकरण तज्ञ२,वैधकीय अधिकारी बालरोग तज्ञ २ इत्यादी एकूण २० नियमित पदे असून बाह्ययंत्रनेकडून भरावयाची अधिपरिचारिका १२ पदे,बालरोग परिचारिका ५ इत्यादी एकूण ५५ पदे समाविष्ट आहेत.
आमदार आत्राम यांनी अहेरी विधानसभा व जिल्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत.सामान्य व गरीब जनतेप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशिलतेमुळेच त्यांनी या विषयाला सातत्याने शासनाकडे लावून इतक्या मोठ्या संख्येने अहेरी येथील स्त्री रुग्णालयातील पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात मोडणाऱ्या अश्या ताडगाव ता.भामरागड व जारावंडी ता.एटापल्ली येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्रे मंजूर केली असून लवकरच त्यांच्या बांधकामांना सुरुवात होणार आहे.आमदार आत्रामांच्या या कार्याचे परिसरात भरभरून कौतुक होत असून सामान्य जनता त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आभार मानत आहेत.