आविसचे वेडमपल्ली येथील कार्यकर्त्यांचे रा.काँ.अजित पवार गट पक्षात प्रवेश
मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी घडीचे दुपट्टा टाकून केले स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार गट बळकटीकरण
अहेरी:- तालुक्यातील वेडमपल्ली येथील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट)प्रवेश केले असून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे घडी चिन्हाचे दुप्पटा टाकून स्वागत केले.
रेपनपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते इर्शाद शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मखमुर् शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री ना . धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी आलापल्ली येथे आविसचे तिरुपती नीलम, अशोक नीलम , प्रभाकर वेलादि ग्रा.पंचायत सदस्य, रामदास मुलकर, मधुकर मुलकर, नामदेव नीलम, सुनील वेलादि,अनिल नीलम, सोनू मुलकर , नरेश वेलादि, किशोर आत्राम आदि व असांख्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात पक्षप्रवेश केले.
ऐन विधानसभा निवडणुकीत आविसचे कट्टर कार्यकर्ते व समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पक्षात प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून बळकट झाले आहे.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवाऱ, इरफान पठाण, सुरेंद्र अलोणे, संदीप ढोलगे, आफ्रिदी सैय्यद होते.