मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दुप्पटे टाकून स्वागत केले
गावात आगमन होताच डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे जंगी स्वागत
अहेरी:– तालुक्यातील आलापल्ली नजीकच्या मद्दीगुडम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले.पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी घडी चिन्हाचे दुप्पटे टाकून स्वागत केले.
गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)उमेदवार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रचार सभा होते. सभे दरम्यान मद्दीगुड्म येथे डॉ. धर्मराव बाबा पोहचताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व फुलांच्या वर्षावांनी आणि धर्मराव बाबा आप आगे बडो, हम आपके साथ है अशा घोषणाबाजीने जंगी स्वागत केले.
प्रचार सभेचे औचित्य साधून व माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्र्वास ठेऊन माजी आमदार दीपक आत्राम यांचे जुने समर्थक व्यंकटेश पडालवार, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरूनुले, पूनेश तोटावार, दर्शन पोटे, रमेश पेंलीवाऱ, समय्या सूंकरी, श्रीकांत कोंकावार, स्वप्नील तुमडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सुरेंद्र अलोणे यांनी तर उपस्थितांचे आभार लक्ष्मण येरावार यांनी मानले. यावेळी महिला भगिनी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी पराग पांढरे, श्रीनिवास बोमनवार, रमेश मद्दर्लावार, शुभम चिंतावार यांनी सहकार्य केले.