आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने सनद पट्टे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप

आज दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मौजा कोलपल्ली येथे आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या तर्फे आणि अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते सनद पट्टे (प्रॉपर्टी कार्ड)वाटप करण्यात आले.
तसेच आदिवासी बांधवांच्या प्रॉपर्टी कार्ड साठी खूप काही अडचण येत होता ही माहिती लक्षात घेऊन धर्मराव बाबा आत्राम यांनी लवकरात लवकर अधिकारी साहेबांना तयार करण्यात सांगले आणि ज्या ज्या बांधवांची प्रॉपर्टी कार्ड तयार झाले त्या बांधवांना माजी. पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते मोहिनी जयराम सडमेक, रमेश दशरथ गावडे, पोच्या सडमेक, आनंदराव सडमेक, भीमराव मुसली गावडे, यांना वाटप करण्यात आले. तसेच अजून पुष्कळ प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आश्वासन हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी गावकरी बांधवांना सांगितले.
यावेळी उपस्थित सर्वे अधिकारी पंकज अंभोरे, राष्ट्रवादीचे अहेरी विधान सभा अध्यक्ष – लक्ष्मण येर्रावर, तिरुपती मडावी, रवि सडमेक, योगेश तलांडे, संतोष सडमेकसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि गावातली नागरिक उपस्थीत होते.