6 डिसेंबर व 3 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा;सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांची मागणी
शिष्टमंडळाद्वारे लवकरच राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार

अहेरी:– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आणि 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी शासनाने सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
पत्रकात सुरेंद्र अलोणे यांनी नमूद केले आहे की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले अख्ये आयुष्य आदिवासी, दलीत, मागासवर्गीय , शोषित, पीडित, शेतकरी, कष्टकरी ,एकंदरीत बहुजनांच्या हितासाठी अर्पण केले असून देशासाठीही फार मोठे योगदान असल्याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याना व स्मृतींना नतमस्तक व अभिवादन करण्यासाठी शासकीय सुट्टी देण्यात यावी अशी तीव्र व एकमुखी मागणी केले आहे.
विशेष म्हणजे यंदा 6 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, यासंदर्भात राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे पण हे सुट्टी केवळ मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. मात्र या दिवशी देशात व राज्यभरात शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी सुरेंद्र अलोणे यांनी केले आहे.
तसेच 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या असून सावित्रीबाईंचे कार्यही महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक असल्याने आणि फुले दाम्पत्यांचे कार्य आजही भारतीयांच्या मनात तेवत असून 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी मागणी केले आहे.
पत्रकात पुढे, 6 डिसेंबर आणि 3 जानेवारी च्या दिवशी शासकीय सुट्टीच्या संदर्भात लवकरच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार तथा राज्याचे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली व सोबत शिष्टमंडळाद्वारे राज्याचे महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री व संबंधितांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देणार असल्याचे उल्लेख पत्रकात केले आहे.