पेरमिली पट्टीतील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत(अजित पवार गट)प्रवेश
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी दुपट्टा टाकून स्वागत केले
ऐन निवडणुकीत पक्ष प्रवेशामुळे वातावरण घडीमय
अहेरी:– तालुक्यातील पेरमिली येथे सोमवार 21 ऑक्टोबर रोजी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद व राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होते औचित्य साधून पेरमिली पट्टीतील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) प्रवेश केले असून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी घडी चिन्ह पक्षाचे दुप्पटे टाकून स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या हंगामात विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँगेस (अजित पवार गट)पार्टीत प्रवेश केल्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात वातावरण घडीमय झाले आहे.
पेरमिली पट्टीतील पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये पेरमिली येथील संतोष मेश्राम, भिमराव सडमेक, गोविंदा आत्राम, राकेश तमराजुलवार, अंकुश तोरेम, रूपेंद्र वेलादि, प्रवीण मेश्राम, महेश वनपाखरे, दिलीप आत्कुलवार, अमोल कुंभारे, राकेश सारनपल्लीवार, विस्तारी वनपाखरे, अविनाश झाडे, मनू कुळमेथे, किटू तलांडे, सचिन गावडे, अंकुश सडमेक, मुकेश सिडाम, नागोराव मडावी, संपत गावडे, देवराव मडावी, आदित्य दुर्गे, बीचु तलांडे, करण सडमेक आदी आहेत.
चंद्रा गावातील रवींद्र सिडाम, साईनाथ तलांडे, रघुपती सोयाम, भास्कर वेलादि, सुनील मडावी, तेजराव वेलादि, किशोर सोयाम, दिलीप गावडे, इंदरशाह मडावी, लक्ष्मण वेलादि, महेश आलाम, बबलु वेलादि, संपत वेलादि, गणेश वेलादि, संतू सोयाम, गिरमा वेलादि यांचा समावेश आहे तर चंद्रा टोला येथील रघुनाथ तलांडी, रोहित वेलादि, संदीप वेलादि, प्रवीण तलांडे, दिनेश वेलादि, अजय तलांडे, किशोर सिडाम, मोरेश्वर आत्राम, प्रमोद तलांडे आदींचा समावेश आहे.
आलदंडी गावातील ऋशु गावडे, सोमा गावडे आणि मेडपल्ली गावातील सुनील मेश्राम, दीपक पेंदाम, बाबुराव वेलादि, देवू पल्लो, किशोर पेंदाम, संतोष तलांडे, गंगाराम कोडापे, मुत्ता नैताम, शंकर पेंदाम आदींनी प्रवेश केले असून विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँगेस पार्टीत (अजित पवार गट)बहुसंख्येने प्रवेश केल्याने अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) राजकीय वर्तुळात ‘घडीचा डंका ‘ वाजत असल्याचे दिसत आहे.