शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे

अहेरी:– 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.
सर्व प्रथम सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम व डॉ.शिवकुमार पेंदाम यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करण्यात आले.
त्या नंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगर सेवक महेश बाक्केवार, नगर सेवक विलास गलबले, नगरसेविका नौरास शेख, नगर सेविका मिनाताई ओंडरे, ज्योती सडमेक, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांच्या वतीने रुग्णांना फळे व बिस्कीट वितरीत करण्यात आले.
त्या नंतर सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, सुरेंद्र अलोणे, सारिका गडपल्लीवार यांनी रय्यतेचे राजे , राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य व गौरव जिवन कार्यावर प्रकाश टाकण्यात टाकले.
यावेळी संदीप ढोलगे, आसिफ खान, लक्ष्मी कुडकावार, जरीना शेख, शशिकला काटमवार, रोशन सैय्यद, हमजा शेख आदी व असंख्य युवक उपस्थित होते.