Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य जनसंवाद कार्यक्रम:मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांची विरोधकांना जोरदार फटकेबाजी

विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचे रा. काँ.पक्षात प्रवेश!

सिरोंचा:– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) शुक्रवारी जनसंवाद कार्यक्रम झाले. सिरोंचा येथे पहिल्यांदाच तुडूंब गर्दी झाली होती.
जनसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर तेलंगणा राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. रवींद्र शामला , अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष नीलम रामकिष्टम,  महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेल्ली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी , महिला तालुकाध्यक्ष मनीषा चल्लावार, अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, कोंड्रा विश्वेश्वर राव, सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश गंजीवार,  नगर सेविका पद्मा भोगे, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचार्लावार, ओमप्रकाश ताटीकोंडावार, समय्या पसुला, नागेश्वर गागापूरवार, श्रीहरी भंडारी, सत्यनारायण परपटलावार, फाजील पाशा, डेव्हिड बोगी, सुरेंद्र अलोणे, रवी सुलतान, कटकु  कोंडय्या आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी , राज्य शासनाचे लोकाभिमुख योजना व सोयी सवलती याविषयी माहिती सांगून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून निवडणुका येताच काही संभाव्य उमेदवार घराबाहेर पडत असून त्यांची जागा जनतेनी नक्कीच दाखवावे असे आवाहन करून मला परत एकदा जनसेवा करण्याची संधी द्याल  विरोधकांवर असा ठाम विश्वास व्यक्त करून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केले.
उल्लेखनीय म्हणजे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले तसेच प्रथमतःच सिरोंचा येथील सभेत तुडूंब व अलोट गर्दी झाल्याचे इतिहास बनले.
जनसंवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. फिरोज खान यांनी तर सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र प्रसाद मेंगनवार यांनी केले.उपस्थितांचे आभार सुरेंद्र अलोणे  यांनी मानले.यावेळी फार मोठा जनसमुदाय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button