ऑटो संघटनेची मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या सोबत सकारात्मक चर्चा!
पासिंग साठी अहेरी किंवा आलापल्लीत ट्रॅक व्हावे अशी केले मागणी
अहेरी:- आरटीओ कार्यालय गडचिरोली तर्फे अहेरी किंवा आलापल्ली येथे वाहन पासिंग करीता वाहन धारकांना सोयीचे व्हावे यासाठी वाहन तपासणी ट्रॅक व्हावे यासाठी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतेच भेट घेऊन ऑटो चालक संघटनेनी सविस्तर व सकारात्मक चर्चा केले.
वाहनाचे पासिंग करण्याकरीता जिल्हा मुख्यालय गडचिरोली येथे ये -जा करावे लागते. सिरोंचा व भामरागड येथील वाहन धारकांना अधिकचे अंतर पडते. त्यामुळे खूप त्रास सहण करावे लागत आहे, त्यामुळे अहेरी-आलापल्ली किंवा परिसरात वाहन तपासणी ट्रॅक मंजूर करण्यात यावे अशी मागणी ऑटो युनियन केली आहे.
विशेष म्हणजे वर्षा, दोन वर्षातून ऑटो पासिंग साठी गडचिरोली येथे जाणे अनिवार्य आहे, त्या साठी संपूर्ण दिवस जातो हा अहेरी उपविभातील ऑटो मालक चालकांसाठी खूप त्रासदायक असल्याने वाहन तपासणी ट्रॅक अहेरी किंवा आलापल्ली येथे मंजूर करून ट्रॅक उभारण्यात यावे अशी मागणी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे लावून धरले. त्यावर प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी युनियनला दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यामन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम , माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, रा.काँ.चे ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम, सुरेंद्र अलोणे आदी मान्यवर होते
ऑटो चालक युनियनचे शिष्टमंडळात मुकत्यार शेख, मुस्ताक शेख, शफीक शेख, इबना हुसेन, विनोद कारेंगुलवार, राहुल दुर्गे आदी व अन्य सदस्य उपस्थित होते.
ऑटो टॅक्सी चालक-मालक महामंडळ कार्यालय तात्काळ व्हावे
ऑटो, टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ नुकतेच राज्यशासनाने बनविले असून त्याचे कार्यालय अद्यापही गडचिरोली येथे उघडण्यात आले नसल्याने ऑटो टॅक्सी, चालक- मालक कल्याणकारी महामंडळ गडचिरोली येथे तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी सुद्धा केले. त्यावर लवकरच शासन निर्णय घेईल असे आश्वासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी ऑटो संघटनेला दिले.
एकंदरीत वाहन पासिंग साठी अहेरी किंवा आलापल्ली येथे वाहन ट्रॅक (पासिंग केंद्र) आणि ऑटो टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळचे कार्यालय गडचिरोली येथे उघडण्या संदर्भात मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने ऑटो चालक मालक यांचे आशा पल्लवित झाले.