Uncategorized

सक्षम नेतृत्वाला निवडून द्या;मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

एटापल्ली:- विकासाला चालना देण्यासाठी खंभिर व सक्षम नेतृत्वाला निवडून द्या असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते बुधवार 16 ऑक्टोबर रोजी एटापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) च्या बूथ कमिटीच्या बैठकीत अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
बैठकीत अध्यक्षीय स्थानी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई अलोणे,  एटापल्ली पंचायत समितीचे माजी सभापती बेबीताई लेकामी, एटापल्ली राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पौर्णिमाताई  श्रीरामवार, माजी जि.प.सदस्य संजय चरडूके सपना ताई कोडापे, मनीष दुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, भामरागड तालुकाध्यक्ष रमेश रामगोनवार, मनीष दुर्गे, लक्ष्मण नरोटे, सांबाजी हीचामी आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, महायुती सरकार लोकाभिमुख व लोकहितार्थ निर्णय घेणारे असून  मुख्यतः राज्यात लाडकी बहीण ही अभिनव योजना अंमलात आणून महिला भगिनिंचे सक्षमीकरण करण्याचे मिशन हाती घेतले असून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून अन्य उमेदवारांमध्ये अनुभवाचा अभाव व निष्क्रिय असल्याने होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता जनार्दन मला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करून मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे  असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक आणि अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले. मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे “घडी” चिन्हाचे दुपट्टा टाकून स्वागत केले.
प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चेरडूके यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, उपस्थितांचे आभार शंकर मेश्राम यांनी मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने मजबूत होते.

 एटापल्ली नगरी दुमदुमली!
एटापल्ली येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच आदिवासी समाजाचे संस्कृती, परंपरा, रीती रिवाजानुसार ढोल ताशानी जंगी स्वागत करण्यात आले. याच वेळी धर्मराव बाबा आप आगे बडो, हम आपके साथ है.., ‘ये रेला नही, धर्मराव बाबा का मेला है ‘अशा जयघोष व नारेबाजीने एटापल्ली नगरी दुमदुमली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button