घाई व निष्क्रियाना घरी बसवा;मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे टीकास्त्र
अहेरी येथे बूथ कमिटीची प्रशिक्षण शिबिर
अहेरी:- या आधी संधी देऊनही कोणतेच कामे न केल्याने निष्क्रिय नेत्यांना आणि अती महत्वाकांक्षेत अतिउत्साहात घाई करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून घरी बसवा असा टीकास्त्र मंत्री ना.धर्मराव आत्राम यांनी सोडले व विरोधकांवर घणाघात आरोप केले.
ते मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी येथील वासवी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा पुष्पाताई अलोणे, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दीवार, सांबय्या करपेत, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, मागील तब्बल पन्नास वर्षांपासून मी जणसेवेचे व्रत हाती घेतले असून अविश्रांत कार्य करीत आहे, निष्क्रिय असणाऱ्यांना घरी बसवा असे म्हणत माजी राज्यमंत्री अंब्रीशराव महाराज यांच्यावर तर अती महत्वाकांक्षेत व उत्साहात अतीघाई करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्यावर टीकास्त्र सोडून अन्य विरोधकांवरही घणाघात आरोप केले.
यावेळी रविंद्रबाबा आत्राम, पुष्पाताई अलोणे, सुरेंद्र अलोणे, आलापल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, सांबय्या करपेत आदींनी आपले विचार व्यक्त केले.
विशेष म्हणजे बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिराचे औचित्य साधून विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश मडावी यांनी तर सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले. उपस्थितांचे आभार कैलास कोरेत यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ कमिटीचे सदस्य, तसेच अहेरी व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.