Uncategorized

महायुतीची आढावा बैठक :ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

अहेरी :२५ ऑक्टोबर २०२४ रोजी अहेरी येथील वासवी हॉलमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना. धर्मराव बाबा आत्राम यांना विजयी करण्याच्या उद्देशाने एक महत्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम, माजी खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँगेस जिल्हाध्यक्षा पुष्पा अलोणे, तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार आणि युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बबलु हकीम, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सतीश गंजीवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, विनोद आकनपल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष, सतीश गंजीवार भाजपा ज्येष्ठ नेते, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर डेकाटे, रहीम माजी पंचायत समिती उपसभापती सिरोंचा, सुनील बिश्वास भाजपा भामरागड तालुकाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट गौरव बाला मुलचेरा तालुकाध्यक्ष, अक्षय करपे अहेरी तालुकाध्यक्ष, पौर्णिमा इश्टाम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, अहेरी विधानसभा, युधिष्ठिर बिश्वास, मधुकर कल्लूरी, रमेश मारगोनवार, रमेश समुद्रालवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत महायुतीच्या अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील पदाधिकार्‍यांचे महत्त्वाचे विचार आणि आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी ना. आत्राम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले आणि ना. आत्राम यांच्या विजयासाठी ठोस योजना आखण्यावर जोर दिला. या बैठकीमुळे महायुतीचे कार्यकर्ते अधिक प्रेरित झाले असून, आगामी निवडणुकांसाठी एकजुटीने काम करण्याची तयारी सुरू आहे.
महायुतीच्या या बैठकाने ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन उत्साह निर्माण केला असून, या संघटनेच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button