आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
कोट्यवधींच्या निधीतून होणार बांधकाम

सिरोंचा:अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सिरोंचा तालुक्यात २३ डिसेंबर रोजी नगरम येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तालुक्यातील नगरम येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (३६३ सी) ला हा रस्ता जोडला जाणार असून यासाठी अर्थसंकल्प सन २०२३-२४ अंतर्गत तब्बल २१५०२५४१/- निधी मंजूर करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे गावात आगमन होताच गावातील नागरिकांनी पुनश्च एकदा बहुमताने आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांचे शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आमदार आत्राम यांनी गावकऱ्यांशी आस्थेने संवाद साधत समस्या जाणून घेतली.
रस्ता बांधकाम भूमिपूजन प्रसंगी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,नगरसेवक सतीश राचर्लावार,दामोधर,ओमप्रकाश ताटीकोंडावार,कृष्णमूर्ती रिकुला, अरिगेला,माजी जि प अध्यक्ष समय्या पसूला,रवी सुलतान,रमेश मानेम आदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.