उद्या धर्मराव बाबा आत्राम उमेदवारी नामांकन दाखल करणार
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
अहेरी:- महायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे(अजित पवार गत) उमेदवार धर्मराव बाबा आत्राम 69 अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रासाठी आज 29 ऑक्टोबर मंगळवार रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत.
विशेष म्हणजे या आधी धर्मराव बाबा आत्राम हे राज्यमंत्री पद व कॅबिनेट मंत्री पद भूषविले असून यंदाची अहेरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक चुरशीची असली तरी कामाचा अनुभव व जनाधार लक्षात घेता आणि विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश झाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे जाणवत आहे.
अहेरी विधानसभेत यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल केले असले तरी , शक्ती प्रदर्शनात मागे पडल्याचे दिसून आले. मात्र नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेला म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम हे नामांकन दाखल करीत असून उमेदवारी दाखल करताना फार मोठे शक्तिप्रदर्शन राहणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष व उल्लेखनीय म्हणजे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जनसंवाद व आढावा बैठकीच्या माध्यमातून जनसंपर्क करण्यात धर्मराव बाबा आत्राम हे आघाडीवर होते त्यामुळे त्यांची बाजू मजबूत व भक्कम मानली जात आहे.
मंगळवार 29 सप्टेंबर रोजी धर्मराव बाबा आत्राम हे राजवाडा अहेरी येथून उमेदवारी नामांकन अहेरी उपविभागीय कार्यालयात दाखल करणार असल्याने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे करण्यात आले आहे.