Uncategorized

दर्जेदार आरोग्य सेवेला प्राधान्य देणार:आ.धर्मराव बाबा आत्राम

नरसिंहपल्ली येथील आरोग्य पथक इमारतीचे भूमिपूजन

सिरोंचा:जनतेच्या आशीर्वादाने आमदार झाल्यावर आपण शेतकरी ,कष्टकरी, शिक्षण,महिला यांच्या प्रश्नांसोबतच जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात आवश्यक तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच आरोग्य पथक मंजूर करून कोट्यवधींच्या निधीतून नूतन इमारत बांधकाम करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याचा आपला प्रयत्न आहे,असे प्रतिपादन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

आ.धर्मराव बाबा आत्राम मंगळवार २९ एप्रिलला सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.यादरम्यान त्यांनी रेगुंठा परिसरातील अतिदुर्गम नरसिंहपल्ली येथील आरोग्य पथकाच्या नवीन इमारती भूमिपूजनप्रसंगी बोलत होते.यावेळी अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,सिरोंचाचे माजी पंचायत समिती उपसभापती सत्यनारायण परपटला,सरपंच किष्टय्या पोरतेट,उपसरपंच लसमय्या नलगुंटा,राकॉचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,नगरसेवक सतीश राचर्लावार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम. पी. कन्नाके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ.आत्राम म्हणाले की एकेकाळी रेगुंठा परिसर हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जायचा. मात्र,मागील काही वर्षांपासून या परिसरात मुख्य रस्ते,नदी-नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेफ्यापड्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.विविध कार्यालयाचे नूतन इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक निधी खेचून आणला जात आहे.या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन याठिकाणी आरोग्य पथकाची स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून सदर निधी खेचून आणला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 सव्वातीन कोटी रुप्यातून होणार बांधकाम
मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत रेगुंठा आणि नरसिंहपल्ली या दोन ठिकाणी आरोग्य पथक आहेत.नरसिंहपल्ली येथे आरोग्य पथकाची स्वतंत्र मुख्य इमारत नसल्याने उपकेंद्रातून आरोग्य पथक चालविली जायची.मात्र,आता ३ कोटी २९ लाखांच्या निधीतून आरोग्य पथकाच्या नूतन मुख्य इमारतीचे बांधकाम केले जाणार असल्याने आरोग्य विभागाची मोठी अडचण दूर होणार आहे.एवढेच नव्हेतर या परिसरातील रुग्णांना देखील दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. शिवाय रेगुंठा परिसरातील रुग्णांना उपचारासाठी सिरोंचा,अहेरी किंव्हा लगतच्या तेलंगणा राज्यात धाव घ्यावा लागणार नाही.

प्रत्येक गावात रुग्णांवर प्राथमिक उपचार झालाच पाहिजे.गावात आरोग्य विभागाची सुसज्ज इमारत झाली तर रुग्णांना देखील दर्जेदार आरोग्य सेवा मिळते.त्याअनुषंगाने नूतन इमारतीच्या बांधकामासाठी प्रत्यन करून निधी खेचून आणला.आता या परिसरातील आरोग्य विभागात असलेली रिक्त पदे भरण्याची सूचना देणार आहे.
आ.धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button